लोकसत्ता टीम

गोंदिया: जिल्हात मागील दहा ते बारा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे १३०६ वर घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २५ जनावरे वाहून गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले. तर वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने १२ दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीत पुढे आली आहे.बारा दिवस संततधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय
Ravindra Apte, former president of 'Gokul' passed away
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन

एकसारखा पाऊस पडल्याने जिल्ह्यात १३०६ घरे आणि गोठ्यांची पडझड झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आणि वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर नदीकाठालगतच्या गावांत आलेल्या पुरामुळे २५ जनावरे वाहून गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी ४ जणांच्या कुटुंबीयांना प्रशासना तर्फे आर्थिक मदत देण्यात आली. तर घरांची पडझडझालेल्या २०६ नुकसानग्रस्तांना शासनातर्फे त्वरित मदत देण्यात आली आहे. मंगळवार पासून पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला वेग आला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

आणखी वाचा-भंडारा : गोसीखुर्द धरणाचा डावा कालवा फुटला; शेकडो हेक्टरवरील धान पीक पाण्यात…

गोंदिया जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने १९ जुलै पासून जिल्ह्याला पार धुवून काढले असून बारा दिवसांत जिल्ह्यात तब्बल ५७.३ टक्के पाऊसाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस बरसला असून आतापर्यंत सरासरी ६९८.७ मिमी पाऊस बरसला आहे, तर मागील वर्षी यापेक्षा कमी पाऊस बरसला होता. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातही निराशाच होती व शेतकरी पावसाला घेऊन चिंतित होता. मात्र, वरुणराजाने त्यांची हाक ऐकली व १९ जुलै पासून संततधार पावसाने हजेरी लावली. २९ जुलैपर्यंत बरसलेल्या या दमदार पावसामुळे अवघा जिल्हा ओलाचिंब झाला आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५९४.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत सरासरी ६९८.७ मिमी पाऊस बरसला असून त्याची ११७.६ एवढी टक्केवारी आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी खंडणी वसुलीचा डाव, दुकानासमोर ठेवला बनावट बॉम्ब

रोवणी वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली होती. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पन्हे आणि केलेली रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम करावा कसा, अशी अडचण निर्माण झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणीसाठी आता धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेग

पावसामुळे झालेल्या शेती आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेकडून केले जात आहेत. पाऊस थांबल्याने मंगळवारपासून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला वेग आला आहे.