लोकसत्ता टीम

यवतमाळ : पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरून ऍपे वाहन कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला आणि एक पुरुष असे पाच जण ठार झाले, तर १२ जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये दोन, तीन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला.

Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Three people were killed and three others were injured after roof of building collapsed
मुंबई : इमारतीच्या २० व्या मजल्यावरील छताचा भाग कोसळून तिघे ठार, तिघे जखमी
due to overturning of heavy vehicles traffic Congestion on Ghodbunder road
ठाणे: घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा
uran accidents marathi news
उरण: पिरवाडी किनारा पुन्हा निखळत असल्याने अपघाताच्या शक्यतेत वाढ
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Couples jump from Versova Bridge man saved and search for women begins
वर्सोवा पुलावरून दाम्पत्याची उडी; पतीला वाचवले, पत्नीचा शोध सुरू

आणखी वाचा-सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; चार आठवड्यात पदोन्नती देण्याचे ‘मॅट’चे आदेश

हे सर्वजण पुसद तालुक्यातील मोहा तांडा, गोकी तांडा व पांढुर्ना गावातील आहेत. ते मालवाहू ऍपे वाहनात बकरा घेऊन वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नवस फेडायला जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पुलावरून खाली कोसळला. वाहनामध्ये जवळपास १५ ते २० लोक असल्याची माहिती आहे. पोलीस मृतांची आणि जखमींची ओळख पटवत असून अधिक तपास करीत आहेत. जखमींना पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.