नागपूर : मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पाऊस असल्याने नर्मदा नदीलाही पूर आहे. या पाण्यात नागपुरातील वरिष्ठ डॉक्टरसह पाचजण अडकून पडले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना हे कळताच त्यांनी झटपट हालचाल केल्याने या पाचही जणांपर्यंत वेळीच मदत पोहोचून ते बचावले.
नागपुरातील विवेका या खासगी रुग्णालयात कार्यरत डॉ. ध्रुव बत्रा यांचे वडील डॉ. सुरेश बत्रा हे ६७ वर्षांचे आहेत. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या परिक्रमेसाठी आलेल्या नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉ. सुरेश बत्रा व रामकृष्ण आश्रमातील ४ स्वामी मध्यप्रदेशमधील खरगोन येथील रामकृष्ण आश्रमात थांबले होते. मध्य प्रदेशातील २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर नर्मदा नदीवरील बरगी धरणाचे सात दरवाजे उघडले गेले. दरम्यान इंदूर, सिवनी आणि नर्मदापुरम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरासह मध्यप्रदेशमधील खरगोनमध्येही पुराचे पाणी शिरले. डॉ. बत्रा थांबलेल्या आश्रमात दोन मजली पाणी भरले होते. ही माहिती त्यांच्या नागपुरातील मुलाला (डॉ. ध्रुव बत्रा) मिळाली. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केल्यावरही काहीही करणे शक्य नव्हते. शेवटी डॉ. ध्रुव नितीन गडकरी यांच्या कार्यालयात रात्री उशिरा पोहोचले. ही माहिती गडकरी यांना कळताच त्यांनी झटपट हालचाल करत तेथील मंत्र्यांसह अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
हेही वाचा – नागपूर : रेल्वेने घेतला बिबट्याचा बळी
पाण्याची पातळी जास्तच वाढल्याने ताबडतोब मदत मिळणे कठीण होते. परंतु गडकरींच्या प्रयत्नांनंतर पाचहीजण अडकलेल्या स्थळी बचाव पथक वेळीच पोहोचले. त्यांनी सगळ्यांना सुरक्षित स्थळी हलवले. या घटनेत पाचहीजण बचावल्याने डॉ. ध्रुव यांनी मदतीसाठी नितीन गडकरी यांचे आभार मानले.