यवतमाळ : जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांनी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशातच गेल्या तीन दिवसांत तालुक्यातील पाच व्यक्तींनी आत्महत्या केल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी सकाळी तालुक्यातील शिवणी (धोबे) येथील हरिदास टोनपे (४८) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर लगेच दुपारी तालुक्यातील रामेश्वर येथील एका अविवाहित तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सचिन सुभाष बोढेकर (२८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> दाखल गुन्ह्यांमध्ये नागपूर सहाव्या स्थानावर ; देशात महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे – एनसीआरबीचा अहवाल

मारेगाव तालुक्यातील गेल्या पाच दिवसातील ही पाचवी आत्महत्या आहे. यापूर्वी शुक्रवारी सचिन वासुदेव बोथले (३२), रा. म्हैसदोडका याने विष प्राशन करून, शनिवारी गजानन नारायण मुसळे (२१), रा. नरसाळा याने गळफास घेऊन, तर रविवारी तोताराम अंगत चिंचोलकर (४५), रा. दांडगाव यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सततच्या आत्महत्यांमुळे तालुका हादरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात सातत्याने आत्महत्या होत असताना प्रशासन, लोकप्रतिनिधी, मंत्री कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.

हेही वाचा >>> भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला बोलाविल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहाय्यकाची आत्महत्या?

मारेगावची ओळख आता आत्महत्येचा तालुका अशी होत चालली आहे. दर आठवड्यात चार ते पाच आत्महत्येच्या घटना येथे घडत आहे. सण, उत्सवाच्या काळात या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. प्रत्येकाच्या आत्महत्येची कारणे, परिस्थिती वेगळी आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १८ ते २५ व ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. या आत्महत्यांमागील मानसशास्त्रीय कारणे शोधण्याची मागणी आता पुढे आली आहे.