भंडारा : बांधकाम पेटी योजनेअंतर्गत कामगार कार्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या पेटी वाटपाचा कार्यक्रमात शेकडो महिलांची गर्दी उसळली व एकच गोंधळ उडाला. यावेळी महिला सैरावरा पळू लागला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पेटीसाठी रात्री दोन पासून या ठिकाणी महिला एकत्र जमल्या होत्या. सकाळी पेटी वाटप सुरू झाल्यानंतर महिलांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात काही महिला जखमी झाल्या. मात्र, त्यावेळी तेथे एकच अंमलदार होता त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याच्या वृत्तात सत्यता नाही, असे कातखेडे म्हणाले.

हे ही वाचा…अमरावती : नितेश राणे, सागर बेगविरुद्ध गुन्हा दाखल, धार्मिक द्वेष निर्माण केल्याचा ठपका…

पेटीसाठी धक्काबुक्की

भंडारा शहरातील अग्रेसन भवन मंगल कार्यालयात महिला कामगारांसाठी पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. पेटी घेण्यासाठी अचानक महिलांनी गर्दी केली. यात झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून पेटी मिळावी, यासाठी भंडाऱ्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी भंडाऱ्यात अर्ज भरला होता. दरम्यान, आज नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अग्रेसन भवन येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम असल्याने अगदी मध्यरात्रीपासूनच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला येथे उपस्थित झाल्या होत्या. अशातच, सायंकाळच्या सुमारास महिला पेटीसाठी धक्काबुक्की करून पुढे सरसावू लागल्या. या गर्दीला पांगविण्यासाठी तेथे असलेल्या पोलिसाने महिलांना लाठी दाखवीत दमदाटी केली. त्यामुळे घाबरलेल्या महिला सैरभैर पळू लागल्या. त्यातच चेंगराचेंगरी होऊन काही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर आता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five to six women injured in stampede at labor box distribution event ksn 82 sud 02