नागपूर : रविवार असल्याने पार्टी आणि मौजमजा करण्यासाठी नागपुरातील ६ तरूण मोहगाव झिल्पी तलावावर गेले. तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चार तरुणांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. चौघांनाही पोहणे येत नसल्यामुळे ते बुडायला लागले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाचवा युवक गेला. दुर्दैवाने पाचही तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. ऋषिकेश पराळे (२१,वाठोडा,), राहुल मेश्राम (२३, गीडोबा मंदिर चौक, वाठोडा), वैभव भागेश्वर वैद्य (२४, भांडेवाडी रोड, पारडी) शंतनू ( वय २३) अशी मृताची नावे असून पाचव्या तरुणाची अद्याप ओळख पटू शकली नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पराळे हा युवक प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रमना मारोती चौक) यांच्या कारवर चालक म्हणून नोकरी करतो. त्याची एका रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन असलेल्या शंतनू नावाच्या युवकाशी मैत्री होती. रविवार असल्यामुळे ऋषिकेश याने मोहगाव झिल्पी तलावावर मौजमजा करण्यासाठी जाण्याचा बेत आखला. त्याने मित्र राहुल मेश्रामला याला सोबत घेतले. ऋषिकेश हा रविवारी दुपारी बारा वाजता शंतनू, राहुल आणि अन्य मित्रासह मोहगाव झिल्पी तलावावर पोहचला. तेवढ्यात डॉ. प्राजक्त लेंडे यांचा ऋषिकेशला फोन आला. त्यांनी कुठे आहेस? अशी विचारणा केली. त्याने तलावावर असल्याचे सांगितले. ‘डॉक्टरसाहेब, माहोल एकदम मस्त आहे, तुम्ही पण मौजमजा करायला या’ अशी साद घातली. त्यामुळे डॉ. प्राजक्त लेंडे आणि त्यांचा मित्र वैभव वैद्य हे दोघे एका कारने झिल्पी तलावावर पोहचले.

पोहण्याचा मोह नडला

ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला झिल्पी तलावाच्या निळ्याशार पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. चौघांनाही पोहणे येत नव्हते. मात्र, ऋषिकेशने बढाई मारली आणि चौघेही पाण्यात उतरले. सुरुवातील तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे गेले. चौघेही बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. बुडणाऱ्या चौघांनी त्यालाही पाण्यात खेचले. त्यामुळे पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा >>> नागपूर: पुलावरून कार रेल्वे रूळावर कोसळली, पाच गंभीर जखमी

डॉ. प्राजक्त यांच्या डोळ्यासमोर गेला सर्वांचा जीव तलावाच्या काही अंतरावर डॉ. प्राजक्त यांनी कार उभी केली होती. कारला टेकून ते उभे होते. त्याचवेळी मित्र वैभव हा तलावाकडे धावत जाताना दिसला. त्यामुळे त्यांनीही तलावाकडे धाव घेतली. काठावर पोहचेपर्यंत पाचही मित्र बुडताना प्राजक्त यांना दिसले. मात्र, वैभव वाचवायला गेला आणि तोही बुडाल्याने प्राजक्त हे पाण्याजवळ गेले नाही. त्यांच्या डोळ्यासमोरच पाचही मित्रांचा जीव गेला.