चंद्रपूर : जिल्ह्यात आलेला पूर हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र शेकडो लोक अजूनही सुरक्षित स्थळी आहेत. दरम्यान शुक्रवारी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कार चालक अमित गेडाम याचा मृतदेह दीड किलोमीटर अंतरावर सापडला आहे. जिल्ह्यात वर्धा व इरई नदीला पूर आल्याने रहमतनगर , सिस्टर कॉलनी, राज नगर, सहारा कॉलनी पाण्याखाली आली आहे.
हेही वाचा >>> Buldhana Travels Accident: वारसांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
आता हळू हळू पुराचे पाणी सकाळ पासून ओसरायला सुरुवात झाली आहे. तरीही शेकडो लोक अजूनही महापालिकेच्या शाळांमध्ये वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पोंभुर्णा – आक्सापूर मार्गांवर बेरडी नाल्यात कार वाहून गेली होती. एक किलोमीटर अंतरावर कार सापडली पण कार चालक बेपत्ता होता. कार चालक अमित गेडाम पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयात पुरवठा सहाय्यक म्ह्नणून कार्यरत होते. गोंडपिपरी च्या शासकीय गोदामचा त्यांच्याकडे प्रभार होता. शोध पथकाने नदी काठावर त्याचा शोध घेतला असता दीड किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला आहे.