लोकसत्ता टीम

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील खरप ढोरे आणी चिखली गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला. या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने रेस्क्यू बोटद्वारे सुखरुप बाहेर काढले.

आणखी वाचा-नागपूर: भरपावसात रेल्वे स्थानकाच्या विद्युत देखभाल दुरुस्ती कक्षाला आग लागली कशी?

मूर्तिजापूर तालुक्यातील खरप ढोरे आणि चिखली गावाला पहाटे तीन वाजताच्या सुमारास पुराने वेढले गेले. पुरात अडकलेल्या नागरिक व पशूप्राण्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले. अर्ध्या गावाला पुराने घेरले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले. एक कि.मी.अंतरावरील शेतात रात्रीपासून बाजीराव उईके (४५) हे अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी पुरात ‘रेस्क्यू’ बोट टाकण्यात आली. पाण्याचा प्रचंड वेगात प्रवाह होता. त्यामुळे मधात जाणेही शक्य नव्हते. विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत होत्या. विविध अडचणींचा सामना करून पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरुप वाचवण्यात आले. त्यांना धीर देऊन सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.

Story img Loader