बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील येनगावजवळून वाहणाऱ्या व आज सकाळपासून दुथडी भरून वाहणाऱ्या जोगेश्वरी नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसलेच! यामुळे गावात व शिवारातील शेतात पाणीच पाणी झाले आहे. नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
रात्रभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने जोगेश्वरीला मोठा पूर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचा आवेग वाढल्याने दुपारी हे पाणी गावात घुसले. गावाच्या सखल भागासह, रस्त्यांवर , नजीकच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला पाण्याचा वेढा बसला आहे. गावाचा मडाखेड, वडशिंगी गावासह जळगाव तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood water in yengaon in jalgaon jamod taluka buldhana scm 61 amy