यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे दारव्हा तालुक्यातील अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे. बोरी अरब येथे पुलावर पुराचे पाणी असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत दीडशेहून अधिक घरांची पडझड झाली तर एक व्यक्तीचा आणि चार जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to ongoing rain in Gondia district since early morning administration warned of caution
भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू
heavy rain in Isapur dam area water level increased 7 gates opend alert issued
इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले; विदर्भ -मराठवाडा सीमेवरील गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rain in Yavatmal many villages flooded and flood in Panganga river
यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर
Wardha, Grandfather and Granddaughter Swept Away in wardha, lightning, heavy rain, bridge collapse, Hinganghat,
वर्धा : पूल खचल्याने आजोबा व नात वाहून गेले; शोधमोहीम सुरू…
Rain Kolhapur. Kolhapur river, Kolhapur dam,
कोल्हापुरात पावसाचा मुक्काम कायम : नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा – धक्कादायक! मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करून फेकून दिले

मंगळवारी सकाळी उन्हाचे चटके बसत असताना दुपारपासून पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस कोसळला. रात्री या पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. शहरातील गटार, नाल्यांची सफाई न झाल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर आल्याने अनेक रस्तेही पाण्याखाली गेले. आज बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून पावसाची झड लागल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – वर्धा : पावसामुळे कांदा सडला; कोठारात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल

वाहतूक ३४ दिवस बंद

बोरी अरब (ता. दारव्हा) येथे राज्यमार्गावर अडाण नदीवरील पुलाचे बांधकाम तब्ब्ल दोन वर्षांपासून सुरू आहे. मागील वर्षी पावसाळ्यात दारव्हा-यवतमाळ वाहतूक तब्बल ३४ दिवस बंद होती. या वर्षी बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल ही अपेक्षा होती. मात्र सध्या स्थितीत बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पुलाचे बांधकाम होणार नाही असेच दिसते. या नदीवरील पुलाचे बांधकाम करताना बाजूला तात्पुरता पूल बांधला आहे. हा पूल खूप लहान आहे. थोडा पाऊस आला की पुलावरून पाणी वाहते आणि वाहतूक बंद पडते.