वाशिम : मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समूहांद्वारा बेकायदेशीर मार्गाने होत असलेली घुसखोरी व या घुसखोरीची विशेष चौकशी समितीकडून शहानिशा करण्याच्या मुख्य मागणीसाठी मागील चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामधे दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील राजेश राठोड आणि जालना जिल्ह्यातील श्याम राठोड, सचिन राठोड आणि अमोल राठोड हे चार उपोषणार्थी २५ ऑक्टोबरपासून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्या राजपूत भामटा या जातीच्या नाम सदृश्यतेचा फायदा घेऊन राजपूत समाजाद्वारा शेकडोच्या संख्येत बनावट जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र घेऊन मूळ मागासवर्गीय भटके विमुक्त प्रवर्गातील शिक्षण व रोजगाराच्या संधी हिरावून घेऊन अन्याय करीत असल्याच्या व या बेकायदेशीर कृत्याची मागणी करूनही शासनाकडून बनावट कागदपत्रांद्वारे विमुक्त भटक्यांची जात चोरणाऱ्यांचे पाठराखण करण्याच्या विरोधात अन्न व जलत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. मात्र उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : देशातील एकमेव जगदंबा उत्सवास थाटात प्रारंभ; ११५ वर्षांची वैभवशाली परंपरा
हेही वाचा – नागपूर : १३५ कलाकार १२ तास शास्त्रीय नृत्यातून करणार अखंड घुंगरू नाद
बंजारासह १४ विमुक्त जमातींची आरक्षणरुपी चोरी गेलेली संपत्ती वापस मिळेपर्यंत बंजारा स्वस्थ बसणार नाही, तसेच २९ ऑक्टोंबर रोजी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सुभाष राठोड यांनी दिली.