वाशिम: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात लढा तीव्र केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण करून नेत्यांना गाव बंदी घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील ग्रामस्थांनी २५ ऑक्टोंबर रोजी कॅन्डल मार्च काढून एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देऊन आरक्षणाची मागणी केली तर आज २६ ऑक्टोंबर पासून गावातील बस स्थानक येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेऊन आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा… “हामुन” चक्रीवादळ बनले धोकादायक! “या” पाच राज्यांवर आज होणार परिणाम

अनेक गावात नेत्यांना प्रवेश बंदी घातली जात आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मोठेगाव येथे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आधी कॅण्डल मार्च काढून तर आता साखळी उपोषण सुरू केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For maratha reservation the mothegaon villagers buldhana took out a candle march did chain strike and banned the leaders from the village pbk 85 dvr