नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांचा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गिरीश गांधी, माजी आमदार अनिल सोले, अशोक मानकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी,नंदा जिचकार, आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : अकोल्यात घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

हेही वाचा >>> नागपूर : अधिसंख्य कर्मचाऱ्यांची बाईक मिरवणूक गडकरींच्या निवासस्थानी; उपमुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार असल्याचे गडकरींचे आश्वासन

यावेळी गडकरी म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्या टोपे नगर परिसरात विरंगुळा केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. शिवाय खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या धर्तीवर सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाईल. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक विविध खेळ खेळू शकतील. या महोत्सवात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असला पाहिजे. प्रास्ताविक राजू मिश्रा तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.

हेही वाचा >>> वर्धा : “देवेंद्र फडणवीस पाण्याचा गांभीर्याने विचार करणारा एकमेव नेता”; जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार

निवृत्तीनंतर सगळेच ‘माजी’ होतात

मंत्री हा निवृत्तीनंतर माजी मंत्री होतो. आमदार माजी आमदार होतो आणि अधिकारी असेल तर तो सुद्धा माजी अधिकारी होतो. त्यानंतर सर्वच ज्येष्ठ नागरिक असतात. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ असतो. त्यामुळे आपण किती वर्ष जीवन जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठांनी आयुष्य आनंदात जगावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

ज्येष्ठांसाठी स्वतंत्र इमारत लवकरच

दत्ता मेघे यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक मंडळांची स्वतंत्र इमारत असावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २४ तास ज्येष्ठांसाठी हक्काची जागा व्हावी. त्यात मनोरंजन साधनाशिवाय पुस्तके राहतील. यासाठी तात्या टोपे सभागृह परिसरात एक इमारत लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.