लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीनंतर प्रथम सोने- चांदीच्या दरात मोठी घट झाली. परंतु त्यानंतर दर वाढले, परंतु त्यानंतर पुन्हा दर घसरले. दरम्यान हल्ली सातत्याने सोने- चांदीच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यानंतर प्रथमच सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७२ हजारावर पोहचले आहे.

नागपुरातील सराफा बाजारात ३ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ९०० रुपये होते. हे दर ८ ऑगस्टला दुपारी निच्चांकी पातळीवर म्हणजे सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार रुपयापर्यंत खाली आले. तर प्लॅटिनमचेही दरही प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपयांवर आले.

आणखी वाचा-अकोला : श्री क्षेत्र धारगडमध्ये ‘हर हर बोला महादेव’चा गजर, हजारो भाविक…

दरम्यान आता सोन्याचे दर चांगलेच वाढत असून ग्राहकांमध्ये दरवाढीनंतर दागिने नेमके खरेदी करायचे केव्हा? ही चिंता सतावत आहे. दरम्यान नागपुरात १९ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही महिने सोन्याचे दर घसरल्यावर आता सातत्याने त्यात वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरातील विक्रेत्यांकडून दर वाढण्याचे संकेत दिले जात असून हा सोने, चांदीचे दागिने खरेदीसाठी चांगला काळ असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान प्लॅटेनियमचे दरही १९ ऑगस्टला प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये नोंदवले गेले. हे दर केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सतत स्थिर आहे, हे विशेष.

आणखी वाचा-धक्कादायक! आरटीओ अधिकाऱ्याने निवृत्तीवय वाढवण्यासाठी केले असे की…

चांदीच्या दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात १९ ऑगस्टला चांदीचे दर ८४ हजार रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर १७ ऑगस्टला ८३ हजार ८०० रुपये होते. तर २ ऑगस्टला रात्री बाजार बंद होतांना ८४ हजार ६०० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे चांदीच्या दरातही सातत्याने वाढ नोंदवली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the first time after last few weeks gold rates at 72 thousand per 10 grams mnb 82 mrj