नागपूर : २०२५ मध्ये भारताच्या राज्य घटनेला तसेच गणराज्य लोकशाहीला ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार २२ ऑक्टोबरला भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ संविधान प्रबोधकांचे पथसंचलन व गण सभा आयोजित केली जाणार आहे. हे पथसंचलन सकाळी १० वाजता दीक्षाभूमी व उंटखाना येथून निघून संविधान चौक येथे एकत्रित होणार आहे.
संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, संविधान उद्देशिका स्तंभ व गोवारी शाहिद स्मारक येथे मानवंदना देऊन पुढे इंदोरा मैदानात जाईल व तेथे पथसंचालनाचे गणसभेत रुपांतर होणार आहे. इंदोरा मैदानात दुपारी २ वाजता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व उपस्थित संविधान प्रबोधकांद्वारे सन्मान अभिवादन होणार आहे.
हेही वाचा – वर्धा : ऑनलाईन कामे करणार नाही म्हणत ठिय्या आंदोलन सुरू
हेही वाचा – बुलडाणा : तलाठी अहिर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संघाचे धरणे
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश, संविधान फाउंडेशनचे संस्थापक ई. झेड. खोब्रागडे, बौद्ध महिला मैत्री संघ, नागपूरच्या अध्यक्ष पुष्पा बौद्ध, संविधान संगीति महाराष्ट्रचे संयोजक संभाजी भगत उपस्थित राहणार आहेत.