यवतमाळ – नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या शुक्रवारी सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे भीषण अपघातानंतर बस जळाल्याने किमान २५ प्रवासी आगीत होरपळून मृत्युमुखी पडले.

मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतरही येथील विदर्भ ट्रॅव्हल्सचे कार्यालय सकाळी बंद होते. त्यामुळे येथे माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. ट्रॅव्हल्स संचालक दरणे हे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले.

police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
police arrested the dumper owner in the wagholi accident case
पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Irate Passengers Shatter Glass Vandalize Antyodaya Express Train
चूक कोणाची? अंत्योदय एक्स्प्रेसची तोडफोड! संतप्त प्रवाशांनी ट्रेनची फोडली काच, धक्कादायक घटनेचा Video Viral
Accident News :
Accident News : कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…

हेही वाचा – Buldhana Accident: नागपूरचे प्रवासी कुठे राहतात याची अजुनही माहिती नाही, आठ तास होऊनही बुकिंग ऑफिस बंद

विदर्भ ट्रॅव्हल्स यवतमाळ येथील दरणे बंधू यांच्या मालकीची आहे. नागपूर, यवतमाळ येथून पुणे, मुंबई येथे प्रवासी सेवा देतात. विदर्भ ट्रॅव्हल्स (क्र. एमएच २९, बीई १८१९) बसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांची माहिती ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्राप्त झाली. त्यात रामदास पोकळे, करण बुधवावरे, वृषाली वनकर, इशांत गुप्ता, शृजान, मेघना तायडे, तेजू राऊत, कैलास गंगावणे, संजीवनी घोटे, कौस्तुभ काळे, सुशील केळकर, गुडीया शेख, राजश्री, योगेश गवई, राधिका खडसे, प्रथमेश खोडे, अवंती पाडणेकर, निखील पाठे, शशिकांत गजभिये, आयुष गाडगे हे प्रवास करत असल्याचे पुढे आले.

प्रवासी ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकींग करताना कंपन्या अर्धवट माहिती फिड करतात, हे या अपघातामुळे पुढे आले. कंपनीच्या वतीने सकाळी जाहीर करण्यात आलेल्या यादीत प्रवाशांची केवळ पहिली नावे व फोन नंबर होते. त्यातील अनेक फोन बंद असल्याचे आढळले. पूर्ण पत्ता, अपघात झाल्यास अन्य संपर्क क्रमांक आदी कशाचीही नोंद ट्रॅव्हल्स कंपन्या ठेवत नसल्याचे आढळले. यावर प्रादेशिक परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

हेही वाचा – समृद्धी अपघात : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घटनास्थळाला भेट देणार

अपघात झाल्यानंतर काही दिवस प्रादेशिक परिवहन विभाग कारवाईचा फार्स करतात आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, हेही पुढे आले. विदर्भ ट्रॅव्हल्सची नागपूरहून पुण्याकडे जाणारी ही बस नवीकोरी असल्याचे संचालक विरेंद्र दरणे यांनी सांगितले. गाडीची सर्व कागदपत्रे व वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्रही परिपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघाताची पुनरावृत्ती

आठ महिन्यांपूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिकनजीक अपघात होऊन १२ प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताने झाली. वर्षभराच्या आत लागोपाठ झालेल्या या अपघातांच्या घटनांनी यवतमाळच्या ट्रॅव्हल्स विश्वावर शोककळा पसरली आहे.

Story img Loader