वर्गमित्राने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारातून गर्भवती राहिल्यानंतर बळजबरी तिचा गर्भपात केला. या प्रकरणी मैत्रिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी वर्गमित्र राजदीप सिंह सतनाम सिंह सोहल (२२ रा. बंसीनगर, हिंगणा नाका) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे. आरोपी राजदीप आणि तरूणी बारावीपासून वर्गमित्र आहेत. राजदीपच्या वडिलाचा व्यवसाय आहे. त्यांनी सोबतच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दोघांची मैत्री असल्याने एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे दोघांचेही कुटुंब एकमेकांना ओळखत होते. ११ फेब्रूवारी २०२२ मध्ये राजदीप तरुणीच्या घरी आला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु, तरुणीने त्याला नकार दिला. परंतु, त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार तरुणीच्या घरी यायला लागला. तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होता.
हेही वाचा- भंडारा : धक्कादायक ! अल्पवयीन मुलाचा ६ वर्षीय मुलीवर अत्याचार
१५ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान आरोपीने गिट्टीखदान हद्दीत अनेकदा तरुणीचे शारीरिक शोषण केले. यादरम्याने त्याने मोबाईलने तरुणीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित तयार केली. यादरम्यान तरुणी गर्भवती झाली. त्यामुळे तिने लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिला कोणत्यातरी गोळ्या आणून दिल्या आणि तिचा गर्भपात केला. तरुणीने त्याला लग्न करण्याबाबत विचारणा केली. आरोपीने तिला लग्नास नकार दिला. त्याने तिचे अश्लील छायाचित्र नातेवाईक व मित्रांमध्ये दाखवून बदनामी केली. याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीला अटक केली.