जिल्‍ह्यात आंतरधर्मीय विवाहाचे अजून एक प्रकरण समोर आले असून धारणी येथील एका तरूणीला प्रेम प्रकरणातून पळवून नेण्‍यात आले आणि हैद्राबाद येथे बळजबरीने मौलानाच्‍या घरी विवाह करण्‍यात आला, असा आरोप पीडित तरूणीने केला आहे. या तरूणीला पोलिसांच्‍या मदतीने धारणी येथे परत आणण्‍यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्‍या विरोधात अदखलपात्र गुन्‍हा

मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. या तरुणीला जीवे मारण्‍याच्या धमक्या देऊन तिच्याशी बळजबरीने हैदराबाद येथे एका मौलानाच्या घरी विवाह केला, त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त केले. गोमांस खाण्यासाठी बळजबरी केली जात होती असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. ३ दिवसांपूर्वी तिला नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करून तिला घरी आणले, आता ही तरुणी सुखरूप असून तिने आपल्यावर होत असलेली अत्याचाराची माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडली.

हेही वाचा >>> बुलढाणा : ‘सुजलाम् सुफलाम् पॅटर्न’ची नीती आयोगाकडून दखल ; परराज्यात देखील राबविणार प्रकल्प

या युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला. मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या कुटुंबातील सदस्‍यांवर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी भाजप नेते खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forced inter religious marriage of girl in amravati amy