नागपूर : नागपूर हे देशाचे टायगर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. तीनशे किलोमीटरच्या अंतरावर पाच व्याघ्रप्रकल्प आहेत. दरवर्षी लाखो देश-विदेश पर्यटक येथे व्याघ्र दर्शनाला येतात. मागील दहा वर्षात नागपूर शहर राज्याची राजकीय राजधानी म्हणूनही नावारूपाला आले आहे . केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गृहशहर असल्याने विविध कार्यक्रम, बैठकांच्या निमित्ताने नागपुरात केंद्र,राज्याचे, देश- विदेश अर्थविषयक संस्थांचे बडे अधिकारी येत असतात. फावल्या वेळात तेही जंगल भ्रमण करून येतात. प्रत्येकाला व्याघ्रदर्शन होतेच, असे नाही.पण ज्याला होते तो भाग्यशाली ठरतो. त्यांच्यासाठी तो अविस्मरणीय ठरतो. तो अधिकारी जर विदेशी असेल तर मग सांगायलाच नको! कोणाला सांगू अन् कोणाला नाही असे त्याला होते. मग समोर राज्याचे मुख्यमंत्री का असेना.! असाच एक प्रसंग शुक्रवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा