नागपूर : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ प्रवाशांचा बळी गेला. घटनेचा मुंबईच्या फाॅरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास करून अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात आगीचे खरे कारण पुढे आले आहे.

अहवालानुसार, अपघात झाला तेव्हा बसमध्ये ३५० लिटर डिझेल होते. अपघात रात्री १.३२ वाजताच्या जवळपास झाला. अपघातग्रस्त बस साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर आली होती. अपघाताच्या वेळेला बसची गती ७० ते ८० किलोमीटर प्रति तास होती. अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये म्हणजे ओवरटेकिंग लेनमध्ये धावत होती. अपघातग्रस्त बसचा समोरचा चाक सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डला धडकला. त्यानंतर समोरचा चाक दहा फूट अंतरावर असलेल्या आरसीसी काँक्रिटच्या दुभाजकाला धडकला. याच दुभाजकाला बसचा पाठीमागचा चाकही त्याच पद्धतीने धडकला आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली. जेव्हा बसचा मागील चाक आरसीसी काँक्रिट दुभाजकाला धडकला, तेव्हाही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग ही मोडकळीस आली.

Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
MahaRERA action against 905 housing projects Mumbai news
१,९०५ गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची कारवाई; नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांची बॅँक खाती गोठवली
LA Wildfires reason
१६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?

हेही वाचा – नागपूर: नवे राजकीय समीकरणावर बावनकुळे म्हणाले, हे महायुतीचे, मविआचे नाही

चालकाच्या बाजूच्या समोरच्या आणि मागच्या चाकाची दुभाजकाला धडक झाल्यानंतर बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचा मुख्य द्वार खाली दाबला गेला. फॉरेन्सिक फायर अहवालाप्रमाणे जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने पडली. यावेळी बसच्या समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल जाऊन डिझेल टॅंक वर आदळला. यामुळे ३५० लिटर डिझेल सर्वत्र उडाले. डिझेल टॅंक फुटल्यामुळे उडालेले हे डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि त्यामुळे बसने पेट घेतला.

Story img Loader