चंद्रपूर : नुकतीच वन सर्वेक्षण विभागाने २०२३ ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली. त्यात देशात २१.१७ टक्के जंगल क्षेत्र ,महाराष्ट्रात १६.५२ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात- ३५.२१ टक्के वन क्षेत्र असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ३५.४०% जंगल होते तर २०२३ च्या आकडेवारी नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वनाचे प्रमाण ३५.२१ % आलेले असून २०२१ च्या तुलनेत जंगल कमी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.चंद्रपूर हा भाजप नेते व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा आहे.

हेही वाचा : राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त

चंद्रपूरची तुलनात्मक आकडेवारी

  • २०२१ मध्ये घनदाट जंगल १३२०.८९ वर्ग किमी होते ते २०२३ मध्ये कमी होऊन १३१८.८७ वर्ग किमी झाले.
  • २०२१ मध्ये मध्यम घनदाट जंगल १५५५.३९ वर्ग किमी होते ते घटून २०२३ मध्ये १५२१.६० वर्ग किमी झाले
  • २०२१ मध्ये उघडे वन ११७३.९९ वर्ग किमी होते ते वाढून २०२३ मध्ये ११८९.१८ वर्ग किमी झाले
  • झुडपी जंगलात मात्र अल्पशी वाढ झाली,२०२१ मध्ये हे प्रमाण ४४.०६ होते ते वाढून २०२३ मध्ये ४३ ६७ झाले.
  • २०२१ मध्ये एकूण जील्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ११४४३.०० वर्ग किमी होते , त्या वेळी वनक्षेत्र ४०५०.२७ वर्ग किमी होते मात्र २०२३ मध्ये ते घटून ४०२९.६५ झाले.

हेही वाचा : महिला आयोगाकडे सर्वाधिक तक्रारी वैवाहिक समस्यांबाबत, बलात्काराच्या तक्रारींचाही समावेश

देशात वन क्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपुर वणांचा आणि वन मंत्र्यांचा जिल्हा असताना ,मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले असताना चंद्रपुर चे वन क्षेत्र कसे कमी झाले ? ही अनाकलनीय बाब आहे. आधीच इथे वाघ मानव संघर्ष वाढलेला असताना ,भ्रमण मार्ग तुटले असताना वन क्षेत्र कमी होणे ही चिंतेची बाब आहे असे वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest area declined in chandrapur district of former forest minister sudhir mungantiwar rsj 74 css