चंद्रपूरमधील चांदा आयुध निर्माणी कारखाना, भद्रावती परिसरात धुमाकूळ घालून चार जणांना जखमी करणाऱ्या बिबट्याला शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले. अतिशय गोपनिय पध्दतीने बिबट्याला जेरबंद करण्याची ही मोहिम वन खात्याच्यावतीने राबविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ”आला वसंत, वसंत आला ।” पश्चिम आकाशात सप्त ग्रह-उपग्रहांचा अनोखा नजारा; विविध प्रकारच्या रंगरुपात…

गेल्या पंधरवाड्यापासून पिपरबोडी – आयुध निर्माणी परिसरात हा बिबट धुमाकूळ घालत होता. या बिबट्याने आतापर्यंत चार ते पाच जणांना जखमी केले. सोबतच परिसरातील बकऱ्या व पशुधन फस्त केले. या परिसरातील नागरिकांनी वन खात्याकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याचे प्रयत्न सुरू होते. परिसरात पिंजरे देखील लावण्यात आले. मात्र काही केल्या बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. बिबट्याला आमिष देण्यासाठी बकरी देखील पिंजऱ्यात बांधण्यात आली होती. अशातच शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले.

हेही वाचा- बारावी परीक्षेबाबत मोठी बातमी; उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निर्णयामुळे उत्तरपत्रिका तपासणी…

विशेष म्हणजे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन पिंजरे लावण्यात आले होते. सहायक वनसंरक्षक निकिता चौरे, सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले तसेच क्षेत्र सहायक विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department succeeded in catching the leopard that injured four persons in chanda ordnance factory and bhadravati area in chandrapur rsj 74 dpj
Show comments