नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामधील देवलापर वन परिक्षेत्रात बांद्रा खुर्सापार रस्त्यावर टी-६५ या वाघिणीने गुरुवारी सायंकाळी अंदाजे एक महिन्याचा एक बछडा शेपटीच्या बाजूने उचलून नेल्याचे वन रक्षक चेतन उमाठे यांनी सांगितले. या घटनेनुसार सदर बछडा मृत असण्याची शक्यता होती. शुक्रवारी सकाळी सदर क्षेत्रात गस्त करण्यात आली. वाघीण बछड्यासह असल्यामुळे १० जणांची चमू पाठवण्यात आला. सदर गस्तीत बांद्रा नियतक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ येथे वाघिणीच्या जवळच्या भागात एका बछड्याचे मृत शरीर अर्धवट खाल्लेले दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: नागपूर : ‘ली’ पुन्हा एकदा गर्भवती, यावेळी तरी…

वाघीण मोठ्या आवाजात गुरगुरत असल्याने चमू तेथून निघून आला. वाघीण त्या क्षेत्रातून निघून गेल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. अधिक बाबी स्पष्ट होण्यासाठी सदर भागात कॅमेरा ट्रॅप लावण्यात येत असून गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest guard said that tigress t 65 picked up body of the young calf by its tail pench tiger reserve nagpur rgc 76 tmb 01