लोकसत्ता टीम
नागपूर: महाराष्ट्रातील १७ टक्के जागा वनक्षेत्राने व्यापलेली आहे, विभाग समजून घ्यायचा आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात खात्याची प्रगती केली आहे करोडो झाडे लावण्याचे उद्दिष्ट साध्य केले,असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर येथे केले.
वनखात्याच्याचे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथम गणेश नाईक विदर्भात आले. विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाबाबत गौरवौदगार काढले. विविध प्रकारच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली
आणखी वाचा-नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
बर्ड फ्ल्यू वाघाचा मृत्यू प्रकरण
गोरेवाडा ज्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांना चंद्रपूरला बोलावलेला आहे. प्राथमिक माहिती घेऊन त्याची सत्यता तपासली जाईल, खाद्य तपासून द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाला दिल्या आहेत.सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेल्या प्राणीसंग्रहालयात तात्पुरती बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नवी मुंबई येथे एकनाथ शिंदेची इच्छा नसताना काही बाबी घडल्या, सर्व्हिस रोडसाठी भूखंड दिले. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्या गोष्टीचा निषेध केला हे भूखंड दुसरीकडे द्या, असे नाईक म्हणाले.
मानव वन्यजीव संघर्ष
वनात अतिक्रमण केल्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अभयारण्यातील गाव उठून किंवा शेती असेल तर त्यांना अधिग्रहणकरून त्यासाठी धोरण राबवले गेलेले आहे. पुढच्याकाळात त्यात आणखी सुधारणा केली जाईल.असे नाईक म्हणाले
आणखी वाचा-उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
वाघाचा रस्ता अडवला प्रकरण
व्याघ्रप्रकल्पात नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. नियमाच्या बाहेर जात असेल तर त्या निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
चंद्रपूर ईडी छापा
अभयारण्यात एवढा मोठ्या प्रमाणात कोणी पैसा कमवेल आणि धाड पडेल, मला शंका आहे. ताडोबाच्या नावावर काही दुसरे काही कारभार तिथे चालत असतील तर मला माहित नाही.