लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. मुनगंटीवार यांनी भाषणात काँग्रेसविरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्थानिक मोरव्याच्या प्रांगणात पंतप्रधान मोदींची भव्य निवडणूक रॅली आयोजित करण्यात आली होती. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीपूर्वी मुनगंटीवार यांनी भाषणाला सुरुवात केली, मात्र भाषणादरम्यान मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्यांचे भाषण, शब्द आणि भाषा वाईट वापरल्याने सभेला उपस्थित श्रोत्यांचे विशेषतः महिलांचे डोके शरमेने झुकले.

आणखी वाचा-‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…

मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष असे वर्णन केले. मुनगंटीवार यांच्या तोंडून असा शब्दप्रयोग ऐकून उपस्थित श्रोते अवाक झाले. उच्च विद्या विभूषित मुनगंटीवार यांच्याकडून अशा असंस्कृत भाषेचा वापर झाल्याने समाज माध्यमावर ट्रोल होत आहे.