नागपूर: विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शुन्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपुर्ण उपाययोजना करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा… अमृत २.० अभियानाला राज्य शासनाची मंजुरी; चंद्रपूर महापालिकेला मिळणार २७० कोटी

काल गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी वनविकास महामंडळात तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली येथील वाघाच्या मृत्यू संदर्भात वनमंत्र्यांनी तपास करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार वन विभागाने जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून सर्व आरोपींस अटक करण्यात आली असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांनी सांगितले. या बैठकीस प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनसंरक्षक गडचिरोली रमेश कुमार आदी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

Story img Loader