वर्धा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांची वन्यजीव संवर्धनाच्या कार्याबद्दल भरभरून प्रशंसा केली आहे. वर्धेचे भाजपाचे आमदार डॉ. पंकज भाेयर यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या विविध समस्यांबाबत सातत्याने प्रश्न उचलत पाठपुरावा केला.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर असणाऱ्या राखीव क्षेत्राचा समावेश करीत व्याघ्र प्रकल्पाची एकसंघ नियामक यंत्रणा उभी राहावी. त्यासाठी एकच अधिकारी नियुक्त व्हावा, अशी मागणी डॉ. भोयर यांनी करीत त्याची गरज व्यक्त केली होती. या मागणीला वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. त्याची तात्काळ दखल घेत वनमंत्र्यांनी आदेश जारी केला. हा संदर्भ देत वनमंत्री मुनगंटीवार डॉ. भोयर यांना लिहिलेल्या पत्रातून म्हणतात की जनतेच्या हिताच्या सूचना करून आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करता. पर्यावरण व वन्यजीव यांच्या संवर्धनासाठीही आपण चांगले कार्य करीत आहात. वर्धा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कार्य कौतुकास्पद आहे, अशी शाबासकीची थाप देत मुनगंटीवार यांनी यापुढेही असे उत्तम कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – नागपूर: खापरखेड्यातील राख बंधारा फुटला, शेतांमध्ये राख शिरली; झाले काय वाचा…
यापूर्वीच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार भाेयर यांच्या विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देत विशेष मर्जी दाखविली होती.