चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या मोहर्ली प्रादेशिक वनक्षेत्रात प्रवेश करून वन कर्मचाऱ्याशी वाद घालणाऱ्या तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना मोबाईलवर शिवीगाळ करणाऱ्या वासुदेव ठाकरे, भद्रावती, अक्षय बंडावार, भद्रावती व सुबोध तिवारी, माजरी या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर या वनविभागा अंतर्गत मोहर्ली (प्रादे.) परिक्षेत्रात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजताचे दरम्यान भद्रावती येथील रहिवासी असलेले वासुदेव ठाकरे, अक्षय बंडावार तथा सुबोध तिवार हे अडेगाव या गावामध्ये लाल रंगाच्या गाडीवर आले आहे. यावेळी तिघेही जंगलाच्या दिशेने जात होते. त्यावेळी वनकर्मचारी यांनी या तिघांना जंगल परिसरात फिरण्यास मनाई केली व आगरझरी मार्गे बाहेर निघण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला जंगलाच्या बाहेर काढले म्हणून रात्री १०.३९ वाजता मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना शिवीगाळ केली.

police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

हेही वाचा >>>“गुन्हेगारीवर नियंत्रण अन् शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही उत्तम!” काय आहे वाशीम पोलिसांचा अभिनव उपक्रम, जाणून घ्या…

या प्रकरणाची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर दुर्गापूर पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्वये दाखल करण्यात आला. प्रकरणी ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे चौकशी करीत आहे.

Story img Loader