नागपूर : सुरक्षेची हमी मिळाल्याशिवाय व्याघ्रगणनेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका राज्यातील क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी घेतल्याने राज्याच्या वनखात्यासमोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अखिल भारतीय व्याघ्रगणना २०२२ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील प्रगणना १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे.

देशभरातील वाघांची गणना झाल्यानंतरही त्याचे मूल्यांकन अजून पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे त्यात अचूकता आल्यानंतरच व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर केला जाणार आहे.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार ज्या राज्यात व्याघ्रगणनेत तांत्रिक त्रुटी आढळल्या त्याठिकाणी ही प्रगणना पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात एक ते सहा नोव्हेंबर या कालावधीत व्याघ्रगणना प्रगणना घेण्याचे निश्चित झाले. मात्र, या कालावधीत व्याघ्रगणना घेण्यात येऊ नये, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने घेतला आहे.

 स्वाती ढुमणे या महिला वनकर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर वनकर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत आहे. व्याघ्रगणनेतील मागील २० वनविभागातील त्रुटी विचारात घेता एक ते सहा नोव्हेंबरदरम्यान आयोजित व्याघ्रगणनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने केली आहे.

कर्मचाऱ्यांची भूमिका..

वाढलेल्या गवतामुळे भूपृष्ठावरील आच्छादनावरील नोंदी घेणे कठीण आहे. प्रगणनेतील ‘ट्रॅन्सॅक्ट लाईन’ ही एकाच सरळे रेषेत आखायची असून ती उंचसखल, दऱ्याखोऱ्यांमधून स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार जाणार आहे. सकाळच्या वेळी वन्यप्राण्यांच्या हालचाली मोठय़ा प्रमाणात असल्याने यावेळी गणना जोखमीची असल्याचे वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कारण काय? ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रगणनेची तयारी करताना स्वाती ढुमणे ही महिला वनरक्षक वाघाच्या हल्ल्यात बळी पडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व्याघ्रगणनेला खीळ बसली.

व्याघ्रगणनेला आमचा विरोध नाही. परंतु वनखात्याने या प्रगणनेदरम्यान वनकर्मचाऱ्यांच्या जीविताची हमी द्यायला हवी. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी खात्याने घ्यायला हवी.

अजय पाटील, केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना.

मराठवाडय़ासारख्या ठिकाणी जेथे भीती नाही, त्या ठिकाणी आजपासून गणना सुरू झाली आहे. शेवटी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व्याघ्रगणनेची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.

बी.एस. हुडा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)