नागपूर: नागपूरपासून अडीचशे किलोमीटरवर परिसरात व्याघ्रप्रकल्प, पक्षी अभयारण्यांची रेलचेल असल्याने तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. विशेषतः यात विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे पर्यटनाशी निगडित उद्योग, व्यवसायात वाढ होत आहे. मात्र आता विदेशी पर्यटकांना जंगल सफारीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच विविध सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्थानिक सल्लागार समितीची बैठक घेतली. त्यात त्यांनी विदेशी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कात तसेच व्यावसायिक पर्यटन शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना केल्या. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे तसेच येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या जलाशयात पर्यटकांसाठी हाऊसबोट, सोलर बोट आदी जलपर्यटनाच्या विविध सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी

हेही वाचा – गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

नवेगाव-नागझिरा प्रकल्पात सफारीसाठी एकूण १३५ वाहनांची संख्या मंजूर करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ ४५ जिप्सी कार्यरत आहेत. त्यामुळे उर्वरित वाहने तातडीने पर्यटन सेवेत उपलब्ध करण्याचे व त्यात इलेक्ट्रिकल वाहनांचा प्राधाण्याने समावेश करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना अल्पदरात जंगल सफारीसाठी दोन बसेस सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटकांना जंगलाविषयी योग्य माहिती मिळून पर्यटनवाढ होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत गाईड यांना विशेष प्रशिक्षण देवून त्यांची गुणवत्ता वाढ करण्याचे तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण आयोजित करावे.

हॉटेल, रिसॉर्टमध्ये हरित ऊर्जेचा वापर

व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये ५० टक्के हरितउर्जेचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच येथे ध्वनिप्रदूषण व विद्युत दिव्यांची प्रखर रोषणाई आढल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या.

पाण्यासाठी काचेच्या बाटल्या

प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: बंद करून पिण्याचे पाणी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीत पर्यटकांना उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतानाच स्थानिकांना गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राधाण्याने उपलब्ध कराव्या. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे, पर्यटन विकासाचा व प्रसिद्धीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा – बुलढाणा : एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; एक ठार, पंधरा जखमी

प्रारंभी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा आर. यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मागील वर्षात येथे ३५ हजार पर्यटकांनी भेट देली असून त्यातून ९६ लक्ष ४१ हजार शुल्क जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.

बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा आर., उपायुक्त चंद्रभान पराते, गोंदिया वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. पंचभाई, भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक राहूल गवई आदी याप्रसंगी उपस्थित होते. समितीचे पदाधिकारी तथा मानद वन्यजीव संरक्षक मुकूंद धुर्वे व इतर संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Story img Loader