यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून गृह प्रमुखाने शासनाची जवळपास २० लाखाने फसवणूक केली. ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील रंभाजी नगरात असलेल्या शासकीय मुलींचे वसतिगृह क्रमांक ३ येथे उघडकीस आली. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राजू राठोड (५२ वर्ष रा. रूद्राक्ष नगर, जांबरोड) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या गृह प्रमुखाचे नाव आहे.

हेही वाचा – अकोला : नातेवाईकाकडे महिला पोळ्या करायला गेली आणि नराधमाने केला बळजबरी अत्याचार; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
autoriksha
‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

हेही वाचा – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

शहरातील रंभाजी नगरात शासकीय मुलींचे वसतिगृह क्रमांक ३ आहे. त्या ठिकाणी राजू राठोड हा गृह प्रमुख म्हणून कार्यरत होता. गृह प्रमुखाने २८ जानेवारी २०२२ ते १ ऑगस्ट २०२३ या दरम्यान आपल्या पदाचा गैरवापर केला. तसेच प्रकल्प अधिकारी यांची बनावट मोहर आणि स्वाक्षरी करून वेगवेगळी देयके कोषागर कार्यालयात सादर केली. ही देयके आहरीत करून शासनाच्या महसुलात १९ लाख ७६ हजार ९७६ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल सचिन आजनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलीस ठाण्यात राजू राठोड याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहे.

Story img Loader