अमरावती : बडनेरा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्‍या विकास कामांचे श्रेय घेण्‍याचा प्रयत्‍न आमदार रवी राणा यांनी केल्‍याबद्दल भाजपाच्याच माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मंगळवारी भाजपाचे महापालिकेतील माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी रवी राणा यांनी लावलेल्‍या फलकांना काळे फासले आणि फलकांची मोडतोड केली.

तुषार भारतीय हे भाजपाचे विधान परिषद सदस्‍य श्रीकांत भारतीय यांचे बंधू आहेत. रवी राणांनी भाजपाला पाठिंबा दिलेला असताना त्‍यांना हा ‘घरचा अहेर’ मिळाल्‍याचे बोलले जात आहे. तुषार भारतीय यांनी रवी राणांना खुले पत्र लिहून विकास कामांची नामफलके हटविण्‍याचे आवाहन केले होते. दहा दिवसांत फलक न काढल्‍यास आंदोलनाचा इशारा दिला होता. आज दहा दिवसांनंतर तुषार भारतीय यांनी कार्यकर्त्‍यांसह फलकांवरील रवी राणांचे नाव खोडून काढण्‍याचा कार्यक्रम हाती घेतला.

Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा – यवतमाळ : पोलीस म्हणून बतावणी केली अन्…; युवकाला लुटणाऱ्या तिघांना अटक

रवी राणा हे शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक आहेत. राणा दाम्‍पत्‍याने भाजपाला पाठिंबा दिला आहे, या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्‍याच माजी नगरसेवकांनी राणांच्‍या विरोधात दंड थोपटल्‍याने त्‍यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. रवी राणा हे त्‍यांच्‍या निधीतून होणाऱ्या कामांचे फलक लावण्‍याची कुठलीही संधी सोडत नाहीत. पण, भाजपाच्‍या नगरसेवकांनी मंजूर केलेली कामे आता पूर्णत्‍वास जात आहेत, त्‍या ठिकाणी रवी राणा यांनी स्‍वत:च्‍या नावाचे फलक लावण्‍याचा घाणेरडा प्रकार केला. साईनगर प्रभागात आपण तसेच माजी महापौर चेतन गावंडे, रेखा भुतडा यांनी मंजूर केलेल्‍या कामांवर रवी राणांनी स्‍वत:चे फलक लावून मर्दूमकी सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न चालवला. याआधीही रवी राणांनी आपण मंजूर करून आणलेल्‍या कामांचे श्रेय घेण्‍याची केवीलवाणी धडपड केली आहे, असे तुषार भारतीय यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा – वर्धा : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मंगेश विधळे यांचा अपघातात मृत्यू; जीजाऊ परिवारावार दुःखाचे सावट

बडनेरा मतदारसंघातील भाजपाच्‍या माजी नगरसेवकांनी मंजूर केलेली कामे सध्‍या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या मतदारसंघात भाजपाच्‍या नगरसेवकांची संख्‍या जास्‍त असल्‍याने भाजपाला याचे श्रेय मिळेल, या भीतीपोटी आमदार रवी राणा यांनी त्‍या ठिकाणी फलक लावले, असे भारतीय यांनी सांगितले.