लोकसत्‍ता टीम

अमरावती : भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा या शुक्रवारी सायंकाळी साईनगर येथील साईबाबा विद्यालयातील मतदान केंद्राला भेट देण्‍यासाठी पोहचल्‍या तेव्‍हा शिवसेनेच्‍या माजी नगरसेविका मंजुषा जाधव यांनी त्‍यांना उमेदवाराला केंद्राच्‍या आत प्रवेश करता येत नाही, असे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला, तेव्‍हा नवनीत राणा आणि मंजुषा जाधव यांच्‍यात बाचाबाची झाली.

Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
union minister of state for health prataprao jadhav grab state blood transfusion council office
आरोग्य राज्यमंत्र्यांसाठी ‘एसबीटीसी’चेच संक्रमण
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Bihar Politics
Bihar Politics : प्रशांत किशोर ‘बीपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी मैदानात, पण बिहारमधील नितीश कुमार सरकार आंदोलनाबाबत एवढं बेफिकीर का?
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Avinash Jadhav slam Sanjay Raut
MNS : “बाळासाहेबांना पण उभं राहायला ३७ वर्षे लागली होती”, मनसेचा वापर होतोय म्हणणाऱ्या राऊतांना अविनाश जाधवांचे सडेतोड उत्तर

नवनीत राणा यांनी मतदान केंद्राच्‍या आत प्रवेश केला, तेव्‍हा मंजुषा जाधव यांनी आक्षेप घेतला. उमेदवार आतमध्‍ये प्रवेश करू शकत नाही, असे त्‍यांनी नवनीत राणा यांना सांगितले. त्यावर हे तुम्‍हाला कुणी सांगितले, तुम्‍हाला संपूर्ण माहिती आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. मंजुषा जाधव यांनीही त्‍यावर प्रत्‍युत्‍तर देत मीही निवडणूक लढली आहे, उमेदवाराला आत प्रवेश नसतो, असे त्‍यांनी ठामपणे सांगितले. त्‍यावर पूर्ण माहिती घ्‍या, असे सांगून नवनीत राणा मतदान केंद्रावरून निघून गेल्‍या.

आणखी वाचा-बुलढाणा : मतदानयंत्र बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले… यंत्रणांची धावपळ…

नवनीत राणा या उमेदवार म्‍हणून एकट्या आल्‍या नाहीत, तर त्‍यांच्‍यासोबत लवाजमा होता. त्‍यावर आम्‍ही आक्षेप घेतल्‍याचे मंजुषा जाधव यांनी सांगितले. मंजुषा जाधव या २०१४ मध्‍ये भाजपच्‍या तिकिटावर नगरसेविका म्‍हणून निवडून आल्‍या होत्‍या. पण, त्‍यांना पक्षातून काढून टाकण्‍यात आल्‍यानंतर २०१९ च्‍या महापालिकेच्‍या निवडणुकीत त्‍या शिवसेनेच्‍या तिकिटावर निवडून आल्‍या. सध्‍या त्‍या कुठल्‍याही पक्षात नाहीत. पण, गेल्‍या काही महिन्‍यांपासून त्‍या नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला विरोध करीत आहेत.

दुसरीकडे, ग्रामीण भागातील एका मतदान केंद्रावर बडनेराचे आमदार रवी राणा हे मतदारांना हात जोडत केंद्राच्‍या आत शिरल्‍यावर काही जणांनी त्‍यावर आक्षेप घेतला. मतदारांना आवाहन करण्‍यास मनाई असताना ही कृती आक्षेपार्ह ठरते, असे विरोधकांचे म्‍ह‍णणे आहे.

Story img Loader