लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या शुक्रवारी सायंकाळी साईनगर येथील साईबाबा विद्यालयातील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी पोहचल्या तेव्हा शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंजुषा जाधव यांनी त्यांना उमेदवाराला केंद्राच्या आत प्रवेश करता येत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नवनीत राणा आणि मंजुषा जाधव यांच्यात बाचाबाची झाली.
नवनीत राणा यांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश केला, तेव्हा मंजुषा जाधव यांनी आक्षेप घेतला. उमेदवार आतमध्ये प्रवेश करू शकत नाही, असे त्यांनी नवनीत राणा यांना सांगितले. त्यावर हे तुम्हाला कुणी सांगितले, तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. मंजुषा जाधव यांनीही त्यावर प्रत्युत्तर देत मीही निवडणूक लढली आहे, उमेदवाराला आत प्रवेश नसतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यावर पूर्ण माहिती घ्या, असे सांगून नवनीत राणा मतदान केंद्रावरून निघून गेल्या.
आणखी वाचा-बुलढाणा : मतदानयंत्र बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले… यंत्रणांची धावपळ…
नवनीत राणा या उमेदवार म्हणून एकट्या आल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत लवाजमा होता. त्यावर आम्ही आक्षेप घेतल्याचे मंजुषा जाधव यांनी सांगितले. मंजुषा जाधव या २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पण, त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर २०१९ च्या महापालिकेच्या निवडणुकीत त्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. सध्या त्या कुठल्याही पक्षात नाहीत. पण, गेल्या काही महिन्यांपासून त्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करीत आहेत.
दुसरीकडे, ग्रामीण भागातील एका मतदान केंद्रावर बडनेराचे आमदार रवी राणा हे मतदारांना हात जोडत केंद्राच्या आत शिरल्यावर काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला. मतदारांना आवाहन करण्यास मनाई असताना ही कृती आक्षेपार्ह ठरते, असे विरोधकांचे म्हणणे आहे.