चंद्रपूर : शंभर कोटींच्या जुन्या भूमिगत गटार योजनेची व ५०६ कोटींच्या नवीन भूमिगत गटार योजनेच्या कामाची तसेच २३४ कोटींच्या पहिल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामातील अनियमिततेची चौकशी करावी या मागणीसाठी माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी ४ तास खड्ड्यात बसून आंदोलन केले. ४८ तासात चौकशीचे आश्वासन दिले नाही तर महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातील एका खड्ड्यात माजी नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांना निवेदन देऊन ४८ तासाचा अल्टीमेटम देण्यात आला. ४८ तासात चंद्रपूर महापालिकेतील भोंगळ कारभार व अनियमिततेची चौकशी करण्याची लेखी हमी द्यावी, अन्यथा महापालिकेविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला.

महापालिकेचा भोंगळ कारभार

अमृत पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजनेसाठी संपूर्ण शहर पून्हा एकदा खोदण्यात येत आहे. त्यामुळे धुळ उडते व प्रदूषणामुळे शहरवासियांना अनेक आजार होत आहेत. महापालिकेने ही सर्व कामे थांबवावी, पहिले सिमेंट रस्ते तयार करायचे आणि नंतर पुन्हा फोडायचे हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

Story img Loader