नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक नरेंद्र वालदे यांच्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शांतनूची पत्नी व तिच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत वालदे कुटुंबीयांनी मृतदेह पाचपावली पोलीस ठाण्यात आणला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्याने प्रकरण निवळले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. शांतनू नरेंद्र वालदे (२६, म्हाडा कॉलनी, जरीपटका) असे मृत युवकाचे नाव आहे.

शांतनूचा कृतिका गजभिये (रा. लष्करीबाग) हिच्याशी २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस तो भाड्याने राहायला गेला. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. नंतर, पती-पत्नीत वाद वाढले. सततच्या वादाला कंटाळून कृतिका माहेरी निघून गेली. १८ सप्टेंबरला शांतनू पत्नीला भेटायला सासरी जरीपटक्यात गेला. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात शांतनूविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे शांतनू दुखावला होता. १९ सप्टेंबरच्या रात्री घरी असताना त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार फिरत होते. त्याचे वडील नरेंद्र वालदे यांनी जरीपटका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष बाकल यांना फोन करून पोलीस कर्मचारी पाठवण्याची विनंती केली. दोन पोलीस कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

हेही वाचा – सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ पोलीस अधिकारीच लक्ष्य! आतापर्यंत २१ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट

हेही वाचा – नागपूर – औरंगाबाद महामार्गाने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा…

जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शांतनूचे पार्थिव थेट पाचपावली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कृतिकाचे वडील रवी गजभिये यांनी अपमानास्पद वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शांतनूच्या कुटुंबीयांनी केला. रवी गजभिये यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. ठाणेदार वैभव जाधव यांनी कुटुंबीयांची समजूत काढली आणि निवेदन स्वीकारले. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वालदे कुटुंबीय पार्थिव घेऊन गेले.

Story img Loader