काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे पक्के जातीयवादी आहेत. त्यांच्या याच कार्यशैलीला कंटाळून मी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नाना पटोले लढून जिंकणारे नेते नाहीत तर रडून जिंकणारे नेते असल्याचा आरोप रत्नदीप दहीवले यांनी केला.
हेही वाचा >>>अकोला: २६ वर्षांत २११७ हृदयरुग्णांना नवसंजीवनी; ‘लॉयन्स मिडटाऊन’चा पुढाकार
रत्नदीप दहीवले यांनी गोंदियात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनीत झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.यावेळी दाहिवले म्हणाले, नाना पटोले हे लढून कधीच निवडणूक जिंकत नाहीत. ते नेहमी रडून जिंकतात. साकोली विधानसभा मागच्या वेळी तुम्ही बघितली असेल. त्यावेळी शेवटच्या क्षणाला रडून नाना पटोले यांनी परिणय फुके यांच्या विरोधात निवडणूक जिंकली. नाना पटोले यांचे प्रदेश अध्यक्षपद लवकर जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आता ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करण्याचे काम सुरू केले.