चंद्रपूर : जिल्ह्यात आमदार निधी खर्च करण्यात राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार अग्रस्थानी आहे. तर वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार प्रतिभा धानोरकर शेवटच्या क्रमांकावर आहे.
मतदार संघाचे विकासासाठी आमदाराला दरवर्षी पाच कोटींचा निधी मिळतो. मात्र यावर्षी चार कोटी रुपये शासनाने दिले. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वरोरा भद्रावती, जाते. चिमूर, राजुरा या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अनुक्रमे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार सुभाष धोटे नेतृत्व करतात.सहा आमदारांसाठी सरकारने २४ कोटी दिले.
हेही वाचा >>> बारावी गणिताचा पेपर फुटला; सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्रावर घोळ
२०११-१२ मध्ये आमदार निधी दीड कोटीवरून दोन कोटी झाला. दहा वर्षे निधीत वाढ नव्हती. २०२०-२१ मध्ये तीन कोटी, २०२१-२२ मध्ये चार कोटी व २०२२- २३ पासून प्रत्येकी पाच कोटी दिले जाते. जिल्ह्यातील सहा आमदारांना आतापर्यंत प्रत्येकी ४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळा उपकरणे, जलवाहिन्या, शाळा, समाज मंदिर दुरुस्तीची कामे केली जातात. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाच कोटींपैकी सर्वाधिक २ कोटी ८९ लाख ६० हजारांचा निधी विकासकामांसाठी खर्च केला.
हेही वाचा >>> नागपूर ‘टायगर कॅपिटल’ की ‘संत्रानगरी’? जी-२० च्या निमिततानै ब्रॅण्डिंगवरून पेच
१ कोटी १० लाख ४० हजारांचा आमदार निधी शिल्लक आहे. बल्लारपूरचे आमदार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे २ कोटी ४५ लाख ५७ हजार रुपये खर्च झाले. १ कोटी १४ लाख ४३ हजार शिल्लक आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी २ कोटी ४८ लाख ७० हजारांचा निधी विकासकामांसाठी खर्च केला. १ कोटी ५१ लाख ९३ हजारांचा आमदार निधी सध्या अखर्चित आहे. चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी २ कोटी २ लाख १० हजारांचा निधी खर्च केला. त्यांच्या वाट्यातील १ कोटी ९७ लाख ७२ हजारांचा निधी अखर्चित आहे.आमदार सुभाष धोटे यांनी २ को २४ लाख ९४ हजारांचा निधी आपल्या क्षेत्राती विकासकामांवर खर्च केला. १ कोटी ७५ हजारांचा आमदार निधी सध्या शिल्लक आहे वरोरा-भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी १ कोटी ३१ लाख १० हजारांचा निधी खर्च केला. २ कोटी ६८ लाख ९० हजारांचा आमदार निधी अखर्चित आहे. सहा आमदारांना ३० कोटींचा निधी हवा होता. परंतु २४ कोटीचा निधी दिला आहे.