लोकसत्ता टीम

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नसल्यामुळे ढोल बडवणाऱ्या शिंदे गटावर आता घंटा वाजवण्याची पाळी येणार असल्याची टीका माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

अजित पवारांची सरकारमध्ये एन्ट्री ही शिंदे गटाच्या एक्झिटची सुरुवात आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाचा अवधी दिला आहे, त्यामुळे शिंदे सरकार धोक्यात आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा-“सरकार म्हणजे विषकन्येसारखं, ज्या प्रकल्पात हस्तक्षेप…”; नितीन गडकरींचं मोठं विधान 

विरोधी पक्ष नेते पद काँग्रेस पक्षाकडे येणार आहे. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हाय कमांड घेणार आहे. सभागृहात सरकार विरुद्ध बोलणारा विरोधी पक्षनेता अपेक्षित असून पक्षाच्या नेतृत्वाकडे या सर्वांची माहिती असून पक्ष नेतृत्व विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेणार आहे.

Story img Loader