अमरावती : बीड आणि परभणी येथील घटनांमध्ये रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी टीका माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर केली आहे.मस्साजोग येथील दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध संघटनांच्या वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माजी आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सहभाग घेतला. दरम्यान, बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत सरकारला आव्हान दिले. बच्चू कडू म्हणाले, सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की, ही म्हण खरी ठरायला नको असेल तर अतिशय स्वच्छपणे कारवाई झाली पाहिजे. कारवाई करायची नसेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, होय ते आमचे गुंड आहेत. या दुर्देवी घटनांवर पारदर्शकपणे कारवाई होणे आवश्यक आहे. सत्य महत्त्वाचे असते, सत्ता महत्त्वाची नसते, हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. नाहीतर याचे मोठे परिणाम उद्या सरकारला भोगावे लागतील, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला.

prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
PM Narendra Modi
PM Narendra Modi : जखमी खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस, नेमकं काय घडलं संसदेत?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”

हेही वाचा…निविदा प्रक्रिया अनियमितता प्रकरणात न्यायालयाची नोटीस…आर्णीमध्ये…

बच्चू कडू यांनी आता थेट आंदोलनात उडी घेत मस्साजोग आणि बीड येथील घटनेवरून सरकारला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी आणि मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बच्चू कडू हा पराभवाने खचून जाणारा नाही आणि हिंमतीनेही खचलो नाही, असे बच्चू कडू म्हणाले होते.

हेही वाचा…बीडमध्ये गुन्हेगारीचा भस्मासूर…शिंदेंच्या आमदाराने आपल्यास सरकारला…

बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री होते. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद गेले. महायुतीत असूनही त्यांनी विरोधी भूमिका घेत प्रहार पक्षातर्फे निवडणूक लढवली. निवडणुकीपूर्वी त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली होती, पण तिसऱ्या आघाडीचे आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे आता बच्चू कडू कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कदाचित मी आंदोलक म्हणून लोकांना जास्त आवडत असावा, म्हणूनच त्यांनी आपल्याला यावेळी पराभूत केले असावे, असे ते मिश्किलपणे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

Story img Loader