माजी आमदार डॉ. वसंत बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून के.चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे.
शेतकरी संघटनेनंतर प्रथमच शेतकऱ्यांचा विचार घेऊन के. चंद्रशेखर यांचा पक्ष काम करीत आहे. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा >>>भंडारा: शेतकऱ्याला हरभऱ्याच्या शेतात निद्रावस्थेत वाघ दिसला, पुढे झाले असे की…
डॉ. वसंत बोंडे हे सन १९८५ आणि सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हिंगणघाट मतदारसंघात दोनदा विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत या पक्षाकरीता काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची नाममात्र हजेरी होती. तसेच या काळात त्यांनी कुठल्याही निवडणुकीत भाग घेतला नव्हता.