नागपूर : राज्य पातळीवर भाजपा व शिवसेनेच्या शिंदे गटात सर्वकाही आलबेल नाही, अशा बातम्या येत असतानाच रविवारी पारशिवनीमधील भाजपा मेळाव्यात पक्षाचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शिंदे गटाचे आमदार आशीष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत त्यांचे येथे काम काय? असा थेट सवाल केला. त्यामुळे स्थानिक पातळीवरही युतीमध्ये असंतोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात जाऊन सरकारी योजनांचा आढावा व पक्षाचा मेळावा घेण्याचा उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतला आहे. याच क्रमात रविवारी त्यांनी रामटेक मतदारसंघाची आढावा बैठक रामटेकमध्ये, तर पक्षाचा मेळावा पारशिवनीमध्ये आयोजित केला होता. सरकारी आढावा बैठक असल्याने त्यात लोकप्रतिनिधी म्हणून शिंदे गटाचे आमदार आशीष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. फडणवीस तेथून मेळाव्यासाठी पारशिवनीला आले. त्यांच्यासोबत जयस्वाल आणि तुमानेही आले. भाजपाच्या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार, खासदार पाहून रामटेकचे भाजपाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी संतापले. त्यांनी त्यांच्या भाषणात भाजपाच्या मेळाव्यात शिवसेना (शिंदे गट) आमदार, खासदारांचे काम काय, असा थेट प्रश्न व्यासपीठावर फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे बघून उपस्थित केला व दोघांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला.

eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

हेही वाचा – अमरावती: मेळघाटात वाघाचा युवकावर हल्‍ला; खोल दरीत फरफटत नेले, शोध सुरू

भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बाजूला करून शिवसेना वाढवण्यासारखा हा प्रकार नाही का? अडीच वर्षे हेच आमदार महाविकास आघाडीसोबत होते. त्या काळात त्यांनी महामंडळावर स्वत:ची वर्णी लावून घेतली. भाजपाला विरोध केला. आता मंत्रिपदासाठी ते भाजपासोबत आले आहे. खासदार कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांना मदत केली नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यकर्ते गेले तर त्यांना निधी दिला नाही, त्यांना फक्त भाजपाची मते हवी आहेत, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, व्यासपीठावर उपस्थित फडणवीस, बावनकुळे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. राजकीय वर्तुळात सध्या रेड्डी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.

हवे तर मला पक्षातून काढून टाका

भाजपाच्या विरोधात निवडणुका लढवायच्या आणि पुन्हा आमच्याच पक्षाच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसायचे हे आम्ही खपवून घेणार नाही, हवे तर मला पक्षातून काढून टाका, अशा स्पष्ट शब्दात रेड्डी यांनी जयस्वाल यांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – परदेशी शिष्यवृत्तीचे स्वप्न पाहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा हिरमोड,‘सारथी’चा प्रस्ताव अद्यापही शासनाकडे पडून

हा भाजपाचा मेळावा होता. युतीचा नाही. तेथे फक्त पक्षाच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश होता. आमदार आशीष जयस्वाल व खासदार कृपाल तुमाने यांना निमंत्रणही नव्हते. आमच्याच पक्षाच्या विरोधात निवडणुका लढायच्या व आमच्याच मेळाव्यात न बोलावता यायचे हे कसे खपवून घेणार? – डी. मल्लिकार्जून रेड्डी, माजी आमदार, रामटेक (भाजपा)

Story img Loader