लोकसत्ता टीम

यवतमाळ : निवडणूक म्हटली की, जय, पराजय होतच असतो. आपण तीन वेळा आमदार झालो. मात्र, यावेळी आपल्याला मिळालेली मते सर्वाधिक असूनही पराभूत झालो. विरोधकांनी वैयक्तिक टीका करत टोकाचा प्रचार केला. तरीही, आपल्या मनात कोणाही विरूद्ध आकस नाही. अनेकांनी मतभेद केले, परंतु, मी कोणाही विरूद्ध मनभेद होवू दिले नाही. यवतमाळच्या विकासासाठी भविष्यातही प्रयत्नशील राहील, असे यवतमाळचे माजी आमदार मदन येरावार यांनी स्पष्ट केले.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आपण यवतमाळचा विकास केला नाही, अशी टीका करून विरोधकांनी जनमत तयार केले. मात्र आमदार, मंत्री म्हणून सर्वाधिक निधी आपण खेचून आणला. त्यातूनच यवतमाळमध्ये चौफेर विकास सुरू आहे. विकासकामे करताना नागरिकांना काही ठिकाणी अडचणींना तोंड द्यावे लागले, हे खरे आहे. विरोधकांनी त्याचाच बाऊ करत लोकांच्या मनात आपल्या विरोधात मत तयार केले. अमृत पाणी पुरवठा योजनेचे पाणीच यवतमाळकर गेल्या तीन वर्षांपासून पीत आहे. तरीही या याजनेबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. सत्ता हे समाजसेवेचे साधन आहे, उपभोगाचे नाही, हे भाजपचे तत्व आपणही पाळतो. त्यामुळे आपल्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना आपण संयतपणे या टीकेला सामोरे गेलो.

आणखी वाचा-अकोला : सहकार विभागाची मोठी कारवाई, अवैध सावकारीविरोधात धाडसत्र

गुन्हेगारी वर्तुळातील लोक आपल्या असापास असल्याचा खोटारडा आरोप केला गेला. मात्र ज्यांची सुरूवातच गुन्हेगारीतून झाली, त्यांनी असा आरोप करणे योग्य नव्हते. आता निवडणूक संपली, जुन्या गोष्टी उकरून काढण्यात आपल्याला स्वारस्य नाही. यवतमाळ मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कालही प्रयत्न केले आणि आता राज्यात महायुतीचे सरकार असल्याने भविष्यातही यवतमाळच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू. शहराच्या विकासासाठी कोणाशीही चर्चा करायची आपली तयारी आहे.

यवतमाळमध्ये आपण आणलेली असंख्य विकासकाम सुरू आहेत. ती पुढेही सुरू राहावी, यासाठी सहकार्याचीच भूमिका राहील, असे येरावार यांनी सांगितले. यवतमाळ भविष्यात स्वच्छ, सुंदर, डासमुक्त, २४ तास पाणी असलेले सर्वांचे आवडते शहर राहील, असा विश्वास येरावार यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नाराजी कशामुळे आहे याबाबत मला… पटोले थेटच बोलले…

अत्यंत अल्पसंख्याक समाजातील असुनही यापूर्वीच्या तिन्ही निवडणुकींच्या तुलनेत आपल्याला एक लाखांवर मते मिळाली. हीच आपल्या विकासकामांची पावती आहे. यवतमाळकर जनतेने आपल्याला मदत केली. त्यासाठी त्यांचे आभारच मानले पाहिजे, असे मदन येरावार यावेळी बोलताना म्हणाले. जिल्ह्यात निवडून आलेल्या सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या सर्वच नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देतानाच यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे येरावार म्हणाले. पत्रकार परिषदेला उमरखेडचे नवनिर्वाचित आमदार किसन वानखेडे, भाजप समन्वयक नितीन भुतडा, राजू पडगीलवार, शंतनू शेटे आदी उपस्थित होते.

Story img Loader