वर्धा : पक्षाचे आगामी विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून रांगेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमंडे यांची निवडणूक लढण्याची हौस पुरती फिटली आहे. त्यांनी हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या व भाजपाच्या एका गटास सोबत घेत पॅनल टाकले होते. ते स्वतः हिंगणघाट बाजार समितीत ग्रामपंचायत व सहकारी संस्था मतदारसंघात उभे होते. त्यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – गडचिरोली : गाय वाटप घोटाळ्याची आदिवासी विकासमंत्र्यांकडे तक्रार; भामरागड प्रकल्प कार्यालयातील सर्व कामाच्या चौकशीची मागणी

हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का समजल्या जातो. ते २००४ ला आमदार म्हणून निवडून आले होते. गत विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू झाले होते. मात्र पक्ष सोडणार नसल्याचे ते सांगतात. बाजार समितीच्या माध्यमातून ते वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना हा मोठा धक्का बसला. त्यांचे जवळचे स्नेही इक्राम हुसैन हे म्हणाले की, एवढ्या उंचीच्या व्यक्तीने ही निवडणूक लढवायला नको होती. इच्छाच होती तर भाजपा वगळून कोठारी यांच्याशी जुळवून घेणे अपेक्षित होते.