लोकसत्ता टीम

गोंदिया: माजी आमदार रमेश कुथे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. रमेश कुथे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटात प्रवेश केल्यावर रमेश कुथे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान जिव्हारी लागलं आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मला भाजपने मूर्ख बनवल्याची घणाघाती टीकाही कुथे यांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

फेब्रुवारी २०२४ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला होते. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी रांग आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं. १०० जण आपल्याकडे येतील आणि पाच जण जातील. त्याने आपल्याला फरक पडत नाही. त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला मूर्ख बनवलं, असं माजी आमदार रमेश कुथे म्हणाले. त्यामुळे अश्या पक्षात राहून उपयोग नव्हता.

आणखी वाचा- गडचिरोली : धक्कादायक! आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

मी आधी शिवसेनेत होतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे. २०१९ मध्ये मी भाजपला गोंदिया विधानसभेचे तिकीट मागितलं होतं. त्यावेळी मला त्यांनी तिकीट दिलं नाही. त्यानंतर मी जिल्हा परिषद साठी माझ्या मुलाचं नाव समोर केलं होतं. तेव्हा सुद्धा त्यांनी मुलाला तिकीट नाकारलं. त्यानंतर माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सभापती झाला आहे. आता सुद्धा मला ते तिकीट देणार नव्हते. त्यामुळे इथे राहून उपयोग नव्हता, असं रमेश कुथे म्हणाले.

मुलगा अपक्षच राहणार

उद्धव ठाकरे यांना मी गोंदिया विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. ते मला तिकीट देतील याची मला शंभर टक्के खात्री आहे, असं सांगतानाच माझा मुलगा सध्या तरी अपक्षच राहणार आहे, असं कुथे म्हणाले.

आणखी वाचा-गडचिरोली : धक्कादायक! आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

कुथे यांचा राजकीय प्रवास

शिवसेनेकडून १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा गोंदिया विधानसभेतून आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर आज २६ जुलै रोजी शिवसेना पक्षात घर वापसी केली आहे. २०१९ निवडणुक पूर्वी रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर गोंदिया विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केलं होतं.

आणखी वाचा-अकोला : कृषी कर्ज पुरवठ्याला हवे ‘कॅश क्रेडिट’, खा. अनुप धोत्रे यांची केंद्र सरकारकडे मागणी

२०१९ मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होते. मध्यंतरी त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रमेश कुथे यांच्या निवास स्थानी भेट घेतली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, त्यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर गोंदियात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता मोठी ताकद मिळाली आहे. यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे समीकरण पण पूर्ण पण बदलणार असल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader