वर्धा : येथील बापुरावजी देशमुख सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख गटाने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. सर्व २१ संचालक निवडून आले असून यात सात अविरोध आहेत.

हेही वाचा – थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती

हेही वाचा – उच्च शिक्षणासाठी गडचिरोलीतही ‘एकलव्य पॅटर्न’, जाणून घ्या सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा सहकारी गटातून रमेश राठी, शरद देशमुख, अमोल कसणारे, संस्था गटात सतीश पंजाबराव देशमुख, महिला राखीव शोभा काळे, रेखा घनश्याम जोगवे, भटक्या विमुक्त जमाती गटातून श्रीधर लाभे हे अविरोध निवडून आलेत. कापूस उत्पादक गटातून प्रा. सुरेश देशमुख, सुनील राऊत, नरेंद्र पहाडे, नरेंद्र थोरात, शिरीष वाघ, घनश्याम दाखोळे, अशोक पावडे, पांडुरंग उजवणे, सुरेश सायंकर, शरयू वांदिले, सय्यद अहमद, सुधीर कोठारी व ज्ञानेश्वर झलके यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती जमाती गटातून दिवाकर मून हे निवडून आले आहेत.