नागपूर : माजी आमदार विजय खडसे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मंगळवारी अपक्ष अर्ज दाखल केला. यासंदर्भात पटोले यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमरखेड विधानसभा मतदारसंघातून २००९च्या निवडणुकीत खडसे हे काँग्रेसकडून लढले आणि विजयी झाले होते. त्यांनी उमरखेड मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे अर्ज केला होता. सर्वेक्षणात आपण अव्वल स्थानी होतो, असा दावाही खडसे यांचा आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा काढून देशभरात काँग्रेसचे वातावरण तयार केले.

हेही वाचा…सायबर गुन्हेगारांच्या टोळीकडे तब्बल १६५८ बँक खाती!  ५ कोटींपेक्षा जास्त रक्कम…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी निवड समितीला काही निकष पाळण्याचे निर्देश दिले होते. भ्रष्टाचारी आणि पक्षाबाहेरील व्यक्तींना उमेदवारी न देण्याचे बजावले होते. पण, पटोले यांनी हे सर्व निकष गुंडाळून उमेदवारी दिली, असा आरोपही खडसे यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या तिकीट विकले, असा गंभीर आरोप उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla vijay khadse filed independent application on tuesday after not getting nomination from congress rbt 74 sud 02