गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर आतापर्यंत अजित पवार गटासोबत राहिलेले गोंदिया – भंडारा लोकसभा चे माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. खुशालचंद्र बोपचे यांनी आज बुधवार ११ आक्टोंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुगबईत भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ च्या निवडणुकीतील तिरोडा विधानसभा मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहिलेले युवा नेते रविकांत (गुड्डू ) बोपचे यांनी सुध्दा शरद पवार गटात प्रवेश केला आहे. बोपचे पिता पुुत्राच्या शरद पवार गटात सहभागामुळे गोंंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना पुन्हा एक हादरा बसला आहे. नुकतेच काही दिवसापुर्वी सालेकसा तालुक्यातील युवक आघाडीच्या अध्यक्षाने आपल्या समर्थक सुमारे ३०० कार्यकर्ता सह काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश करुन प्रफुल पटेल गटाला हादरा दिला होता. आज बोपचे पिता पुत्र यांनी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केले. /या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार डाॅ. राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp dr khushal bopche in sharad pawar group gondiya sar 75 amy