वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (शरद पवार गट) राजू तिमांडे यांच्या गाडीचा शुक्रवारी सायंकाळी जोरदार अपघात झाला. त्यांची पत्नी नंदा, पुत्र सौरव तिमांडे तसेच कारचालक हे अमरावती-वर्धा रस्त्याने येत होते. ते सर्व देवगाव फाट्याजवळ असणाऱ्या एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी हिंगणघाटकडे निघाले होते. वर्धेलगत दहेगाव स्टेशनजवळ असताना त्यांची गाडी एकाएकी उसळली. गाडी चार वेळा पलटली. काचा फुटल्या. जवळचे गावकरी गोळा झाले. नक्कीच काही विपरीत झाल्याची चर्चा सुरु झाली. मात्र गाडीतील तिघांच्याही हालचाली दिसून आल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अमरावती : अनाथ, दिव्‍यांगांच्या सेवेला ‘पद्मश्री’चे कोंदण! वझ्झरच्या शंकरबाबा पापळकर यांचा पद्म पुरस्‍काराने गौरव

हेही वाचा – नागपूर : गर्भवती पत्नीला भेटून घरी परतणाऱ्या व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू

गाडीत अडकलेल्या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. किरकोळ जखमा दिसून आल्या. मात्र मोठी दुखापत दिसून आली नाही. त्यामुळे देव तारी त्यास कोण मारी, असा सूर उमटला. दुसऱ्या वाहनाने ते परत निघाले. हिंगणघाट येथे पोहोचताच राजू तिमांडे यांनी तिघांनाही दवाखान्यात नेले. आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या. त्यात धोकादायक असे काहीच निष्पन्न झाले नसल्याचे राजू तिमांडे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former ncp mla raju timande vehicle accident in wardha pmd 64 ssb
Show comments