बुलढाणा: Accident on Samruddhi Highway मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघात व बळींची दुदैवी मालिका कायम आहे! आज मंगळवारी (दि. १८) एप्रिलला दुपारी झालेल्या अपघातात भरधाव कार मालवाहू वाहनाला धडकून झालेल्या अपघातात नागपूरचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या
पुण्यावरून नागपुरला जात असलेली क्रेटा कार आयशरला धडकली. अपघातात प्रवीण हिंगणीकर जखमी झाले तर त्यांची पत्नी जागीच दगावली. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा, चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणिकर यांना प्रारंभी मेहकर ग्रामीण रुग्णालय व नंतर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या हाता पायाला जखमा असून ते सुखरुप आहेत.